बंगळूरमधील छेडछाड महिलांनी कमी कपडे घातल्यानेच: अबू आझमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली : नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान बंगळूरमध्ये महिलांची छेडछाड करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर महिलांनी कमी कपडे घातल्यानेच बंगळूरमधील घटना घडल्याचे सांगत महिलांनी भारतीय संस्कृतीचे जतन करावे, असा सल्ला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिला आहे.

या घटनेला महिलाच जबाबदार असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "जर माझी बहिण किंवा मुलगी सूर्यास्तानंतर 31 डिसेंबर साजरे करण्यासाठी परपुरुषासोबत गेली असेल आणि तिच्यासोबत तिचा भाऊ किंवा पती नसेल तर ही गोष्ट बरोबर नाही. जर कोठे पेट्रोल असेल आणि आग जवळ आली तर आग लागणारच. साखर सांडली तर मुंग्या लागणारच.' यावेळी आझमी यांनी महिलांनी भारतीय संस्कृतीचे जतन करायला हवे, असा सल्लाही दिला.

'नववर्षाला आणि नाताळाच्या वेळी अशा घटना घडत असतातच', अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्‍वरा यांनी सोमवारीच व्यक्त केली होती. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी महिलांचा प्रतिष्ठेचे रक्षण करणे महत्त्वाचे असून ही प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. बंगळूरमधील एमजी व ब्रिगेड रस्त्यावर 31 डिसेंबरच्या रात्री सामूहिक छेडछाडीच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे पोलिसांचा फौजफाटा असतानाही हजारो रोडरोमिओ सामूहिकपणे महिलांची छेड काढत, टोमणे मारत फिरत होते.