'आप' आमदाराच्या निवासस्थानाबाहेर फेकला कचरा; सफाई कामगारांचा निषेध

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली : वेतनाच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या संपादरम्यान आज (मंगळवार) दिल्लीतील सफाई कामगारांनी आम आदमी पक्षाचे त्रिलोकपुरी येथील आमदार राजू धिंगण यांच्या निवासस्थानाबाहेर कचरा फेकून निषेध नोंदविला.

सोमवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सफाई कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. दिल्ली महानगरपालिकेला सफाई कामगारांच्या वेतनापोटी 119 कोटी रुपये दिले असल्याची माहिती सिसोदिया यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र आजही सफाई कामगारांचे आंदोलन सुरूच असून निषेध म्हणून त्यांनी धिंगण यांच्या निवासस्थानाबाहेर कचरा फेकला. वेतनाच्या प्रश्‍नावरून दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगार गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे दिल्लीत ठिकठिकाणी अस्वच्छता आणि कचरा दिसून येत आहे.

सफाई कामगाराच्या एका गटाने सोमवारी रात्री उशिरा संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान दिल्लीतील सर्व सफाई कामगारांनी चर्चा करून आज (मंगळवार) संपाबाबतची पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती दिल्ली महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी संघटनेचे नेत्यांनी दिली आहे. दिल्ली महानगरपालिकेतील कायम आणि करार पद्धतीवरील जवळपास 17 हजार सफाई कामगार प्रलंबित वेतन आणि भत्त्यांच्या मागणीसाठी संपावर आहेत.