OPS यांच्यापाठोपाठ 20 जणांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

चेन्नई : तमिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (OPS) यांच्यापाठोपाठ इतर आणखी 20 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अण्णा द्रमुकच्या प्रमुख नेत्या व्ही.के. शशिकला यांनी ही कारवाई केली आहे. 

अण्णा द्रमुक पक्षाकडून यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मंगळवारी दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच शशिकला यांनी पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची अण्णा द्रमुक पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. 

शशिकला यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटले आहे की, संबंधित सदस्यांनी पक्षाविरोधात वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. 
निवेदनात मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री पांडियाराजन, पक्षाचे प्रवक्ते पोनीयान, माजी मंत्री नथम.आर. विश्वनाथन, के. पी. मुनुसामी, राजेंद्र बालाजी, पी.मोहन, माजी आमदार के. थावसी, के.ए. जयपाल, एस.के. सेल्वम, व्ही. नीलाकंदन, के. अय्याप्पन, ओम शक्ती सेगर, मधुसुदनन यांची नावे आहेत. तसेच, ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा देणाऱ्या काही आमदार आणि खासदारांची नावे या निवेदनात आहेत.  
 
Web Title: sasikala expells 20 other leaders after ops