‘गहू पीएम मोदींचा आहे का? निर्यात करण्याबाबत बोलतात’

Satyapal Malik Attack Narendra Modi
Satyapal Malik Attack Narendra ModiSatyapal Malik Attack Narendra Modi

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) गहू निर्यात करण्याबाबत बोलतात. गहू पीएम मोदींचा आहे का, असा प्रश्न मलिक (Satyapal Malik) यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा होणार असेही मलिक म्हणाले. (Satyapal Malik Attack Narendra Modi)

हनुमानगड जिल्ह्यातील संगरिया येथे कार्यक्रमात सत्यपाल मलिक बोलत होते. सत्यपाल मलिक यांनी अदानी-अंबानींना मोदींचे मित्र म्हटले. एमएसपी ही शेतकऱ्यांची जीवनरेखा आहे. सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही, असेही ते म्हणाले. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी गहू निर्यात करण्याबाबत बोलले होते. यावर त्यांनी हा प्रश्न केला.

Satyapal Malik Attack Narendra Modi
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट; गृहकर्जावरील व्याजदर केला कमी

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना सीबीआयने कोट्यवधींच्या लाचेच्या ऑफरबाबत विचारल्यावर मी त्यांचे नाव सांगेन, असे मलिक (Satyapal Malik) म्हणाले. जेव्हा मी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना ३०० कोटींची लाच देऊ केल्याचा दावा केला होता.

Satyapal Malik Attack Narendra Modi
MPSC : रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून शासन निर्णय जारी

अंबानी आणि आरएसएसशी संबंधित व्यक्तीच्या दोन फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात ही ऑफर दिली जाणार होती. परंतु, त्यांनी करार दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक करताना सांगितले की, त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांना भ्रष्टाचाराशी तडजोड करू नका असे सांगितले होते. उत्तर प्रदेशमध्ये बसपमुळे भाजपला (BJP) विजय मिळाला. बसपने पडद्यामागे पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला विजय मिळाला, असेही मलिक (Satyapal Malik) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com