सौदीच्या राजपुत्राला मृत्युदंड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

तुर्की बिन सौद अल-कबीर असे मृत्युदंड देण्यात आलेल्या राजपुत्राचे नाव असून, त्याला सौदीतील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.

दुबई- रियाधमध्ये सौदीच्या एका राजपुत्राला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर मृत्युदंड देण्यात आल्याची माहिती सरकारी माध्यमांनी आज (बुधवार) दिली. सौदीच्या राजपरिवारातील सदस्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.

तुर्की बिन सौद अल-कबीर असे मृत्युदंड देण्यात आलेल्या राजपुत्राचे नाव असून, त्याला सौदीतील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. वाद झाल्यानंतर अदेल अल मोहेमीद या व्यक्तीचा राजपुत्र तुर्की बिन सौद याने खून केला होता. या प्रकरणी न्यायालयाने राजपुत्राला दोषी ठरविली होते, असे सौदीच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राजपुत्राला कशा पद्धतीने मृत्युदंड देण्यात आला याबाबतची माहिती उघड करण्यात आली नसली, तरी सौदीमध्ये साधारणपणे तलवारीने शिरच्छेद करून शिक्षेची अंमलबजावणी करण्याची पद्धत आहे.

टॅग्स