पाकच्या गोळीबारामुळे राजौरीतील शाळा बंद

पीटीआय
शुक्रवार, 12 मे 2017

जम्मू: पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करत नागरी भागात गोळीबार केल्यानंतर जम्मू-काश्‍मीर सरकारने आज राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पाकच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा पती जखमी झाला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. गोळीबारात एका सरकारी शाळेचेही नुकसान झाले. दरम्यान, भारताच्या प्रत्युत्तरात दोन पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. नौशेरा तहसीलचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

पाकचा कांगावा
इस्लामाबाद : भारताने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जखमी झाल्याचा कांगावा पाकिस्तानने आज केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी ट्‌विटद्वारे भारताने आज सकाळी तंदार, सब्झकोट, खुईरात्ता, बरोन, बागसार आणि खंजर भागात शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याची माहिती दिली. यासंदर्भात पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंह यांना पाचारण केले.