"सेबी'ने मागविला टाटा समूहाकडून खुलासा

यूएनआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

समूहातील काही कंपन्यांमध्ये गैरकारभार आणि "इनसायडर ट्रेडिंग' झाल्याचा आरोप मिस्त्रींनी केला असून, त्याबाबत "सेबी'कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मिस्त्रींच्या तक्रारीवर "सेबी'ने टाटा समूहातील काही कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - टाटा सन्सचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि उद्योगपती नुस्ली वाडिया यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'ने टाटा समूहातील काही कंपन्यांकडून खुलासा मागवला आहे.

समूहातील काही कंपन्यांमध्ये गैरकारभार आणि "इनसायडर ट्रेडिंग' झाल्याचा आरोप मिस्त्रींनी केला असून, त्याबाबत "सेबी'कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मिस्त्रींच्या तक्रारीवर "सेबी'ने टाटा समूहातील काही कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. गैरव्यवहार आणि इनसायडर ट्रेडिंग प्रकरणी या कंपन्यांनी याआधीच शेअर बाजाराकडे आपले म्हणणे मांडले आहे. यात सध्या तरी गंभीर बाब समोर आलेली नाही मात्र, तरीही "सेबी'कडूनही खुलासा देण्यास सांगितले आहे.