अलाहाबादमध्ये ज्येष्ठ डॉक्टरची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

अलाहाबाद (उत्तर प्रदेश)- येथील प्रसिद्ध व ज्येष्ठ डॉक्टराची त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. 12) रात्री घडली, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

शहरातील रामबाग परिसरामध्ये डॉ. ए. के. बन्सल यांचे जीवन ज्योती नावाचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये काम करत असताना दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व ते पळून गेले. गोळीबारानंतर बन्सल यांच्यावर तीन तास उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील डॉक्टरांनी आज संप पुकारला आहे.

दरम्यान, गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शहरामध्ये बन्सल यांची सर्वांत प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळख होती.

देश

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी राजधानीतील मध्यवर्ती भागात बंगला देण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपालांनी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017