Gowai Sumedh Waman
Gowai Sumedh Waman

काश्मीर: चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध गवई हुतात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या दोन भारतीय जवानांमध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सुमेध गवई या जवानाचाही समावेश आहे.

लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी रात्रीपासून शोपियाँत चकमक सुरु होती. अखेर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी झाले आहेत. हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र सुमेध वामन गवई यांचा समावेश आहे. याबरोबरच शिपाई पी. ईलियाराजा हेही हुतात्मा झाले आहेत.

शोपियाँ जिल्ह्यामधील झैनपुरा भागामधील अवनीरा या गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून या भागात मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. ही शोधमोहिम सुरु असतानाच दहशतवाद्यांकडून अचानक हल्ला चढविण्यात आला. सुरक्षा दलांकडूनही या हल्ल्यास त्वरित तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना लष्करी तळावरील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com