उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Sharad Pawars clarification on Udayanrajes Candidature
Sharad Pawars clarification on Udayanrajes Candidature

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. या आमदारांनी माझी भेट घेतल्यानंतर ज्या बातम्या आल्या, त्याचे मला आश्चर्य वाटले, असेही पवार यांनी सांगितले.

उदयनराजे यांच्या उमेदवारीचा विषय गेले तीन दिवस गाजतो आहे. साताऱ्यातील आमदारांनी काल पवार यांची बारामती येथे भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे यांनीही पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावर विविध तर्क मांडण्यात आले. याबाबत पुण्यात बोलताना पवार म्हणाले की, उदयनराजे यांच्या उमेदवारीला एकाही आमदाराने विरोध केलेला नाही. सर्वजण मिळून पुढील आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ. त्यासाठी सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या खेळीमेळीच्या वातावरणात या बैठका घेऊ आणि निर्णय करू असेही त्यांनी नमूद केले.

खुद्द पवार यांनीच ही बाब स्पष्ट केल्याने उदयनराजे यांच्या समर्थकांना साहजिकच दिलासा मिळणार आहे. उदयनराजे यांनी साताऱ्यात पवार यांची भेट घेतल्यानंतर फसवाफसवी करू नका, नाहीतर मलाही कळतं, अशी प्रतिक्रिया दिली होती. पवार यांनी मात्र उदयनराजे आपल्य़ाशी असे बोलले नसल्याचे सांगितले होते. आता पवार यांच्या ताज्या वक्तव्यानंतर सातारा राष्ट्रवादीतील मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com