RSS तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल; शर्मिष्ठा मुखर्जींचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

नवी दिल्ली- 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल असा इशारा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज(गुरुवार) भाषण करणार आहेत. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काल याबाबत ट्विट केले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या भाषणातील विचार पुर्णपणे बाजूला सारुन केवळ तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल', असे ट्विट त्यांनी केले. 

'आजच्या घटनेवरुन भाजप किती घाणेरडं राजकारण करत आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. तुमचं भाषण विसरलं जाईल, भाषणाची व्हिज्युअल्स बाकी राहतील. त्याच्या सोबत खोटी वक्तव्ये जोडून पसरवली जातील. नागपुरला जाऊन तुम्ही भाजप आणि आरएसएस ला खोट्या बातम्या पसरवण्याची संधी देत आहात, असे ट्विट शर्मिष्ठा यांनी केले आहे.

नागपुर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या उपस्थितीबाबत सुरवातीपासूनच वाद निर्माण झाला आहे. 
 
Web Title: Sharmistha Mukherjee Says Speech Will Be Forgotten In RSS Headquarters But Photos Will Always Be