शशी थरुरांविरोधात खटला चालणार 

Shashi Tharoor summoned as accused by court in Sunanda Pushkar death case on July 7
Shashi Tharoor summoned as accused by court in Sunanda Pushkar death case on July 7

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते शशी थरुर यांना आता पत्नी सुनंदा पुष्करच्या मृत्यूप्रकरणी खटल्याला सामोरे जावे लागणार असून, दिल्लीतील न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहेत. थरुर यांना आता या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले असून, 7 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीस त्यांना उपस्थित राहावे लागेल. पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्राचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने थरुर यांना समन्स बजावण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपरोक्त आदेश दिले. 

या प्रकरणामध्ये थरुर यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. चार वर्षांपूर्वी दिल्लीतील लीला हॉटेलमधील सूट "क्रमांक 345' मध्ये सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तयार केलेल्या आरोपपत्रामध्ये कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या नावाचा समावेश केला होता. या आरोपपत्रातील महितीनुसार सुनंदा पुष्कर यांनी नैराश्‍य घालविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्पराझोलम (अल्प्राक्‍स) या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला होता, याला शशी थरुर हेच कारणीभूत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 
 
थरुरांवरील ठपका 
थरुर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि पत्नीशी क्रूरपणे वागल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हे आरोपपत्र पतियाळा हाउस न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हा खून नसून आत्महत्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. खुद्द शशी थरुर यांनी मात्र पोलिसांच्या चौकशीला आक्षेप घेत हा सोपस्कार निरर्थक ठरविला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com