वर्गात जाऊन विद्यार्थिनीला पेटविले

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

तिरुअनंतपुरम : वैद्यकीय महाविद्यालयातील वर्गात जाऊन इतर सर्व विद्यार्थ्यांच्या समोर एकाने 20 वर्षीय विद्यार्थिनीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले आणि स्वतःही पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

केरळमधील कोट्टायम येथे बुधवारी ही घटना घडली. दोघांना मोठ्या प्रमाणात भाजले होते. रुग्णालयामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. लक्ष्मी असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर दोन विद्यार्थ्यांना भाजले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

या कॉलेजमध्ये संप चालू होता, मात्र काही विद्यार्थी आले होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. आदर्श असे पेटवून देणाऱ्या तरुणाचे नाव असून, त्याचे अंदाजे वय 25 आहे. तो त्या कॉलेजचा माजी विद्यार्थी होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 
तो वर्गात आला आणि तिच्या अंगावर पेट्रोल ओतले. ती वर्गाच्या बाहेर पळाली तेव्हा तिला पकडले आणि लायटरने तिचे कपडे पेटविले. नंतर स्वतःच्याही कपड्यांना आग लावली.