इंद्राणी, पीटर मुखर्जींविरोधात खुनाचा आरोप निश्चित

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

या प्रकरणात आणखी एक संशयित असलेला चालक श्यामवर राय याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार ठरविण्यात आले आहे.

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांच्यासह इंद्राणीचा आगोदरचा पती संजीव खन्ना यांच्याविरोधात आज (मंगळवार) मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र निश्चित करण्यात आले.

आरोपपत्रात या सर्वांवर खून आणि खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आता एक फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. सध्या इंद्राणी आणि पीटर मुखर्जी कारागृहात आहेत. इंद्राणीला तिच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे एक दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. शीना आणि संजीव यांनीच खून केल्याचा आरोप आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. 

या प्रकरणात आणखी एक संशयित असलेला चालक श्यामवर राय याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार ठरविण्यात आले आहे. श्यामवर यानेच 2015 मध्ये शीना बोराच्या हत्येप्रकरणी कबुली दिली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.