शोपियाँत दहशतवाद्याचे जवानांसमोर आत्मसमर्पण

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

भारतीय लष्कराच्या हाती गेल्या काही दिवसांत जिवंत दहशतवादी लागला आहे. शोपियाँतील बारबाग गावात एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ही माहिम राबविली. सुरक्षा रक्षकांनी तारिक अहमद या दहशतवाद्याचा खात्मा केला असून, अदिल हा दहशतवादी जिवंत हाती लागला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे.

भारतीय लष्कराच्या हाती गेल्या काही दिवसांत जिवंत दहशतवादी लागला आहे. शोपियाँतील बारबाग गावात एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ही माहिम राबविली. सुरक्षा रक्षकांनी तारिक अहमद या दहशतवाद्याचा खात्मा केला असून, अदिल हा दहशतवादी जिवंत हाती लागला आहे. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी हे काम करत होते. परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

शनिवारी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर केलेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. आज (रविवारी) होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावरील बस स्थानकात हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. राजनाथ सिंह हे सध्या चार दिवसांच्या जम्मू-काश्‍मीरच्या दौऱ्यावर आहेत.