शोपियॉंतील चकमकीत एक दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात शुक्रवारी पोलिस पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमध्ये शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत आज झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या मोहिमेमध्ये सुरक्षा दलांसोबत स्थानिक पोलिसही सहभागी झाले होते. दोबजान खेड्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. या भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना आधीच मिळाली होती. सुरवातीस सुरक्षा दलांनी ज्या घरामध्ये सुरक्षारक्षक दबा धरून बसले होते, त्याला घेराव घातला आणि त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; पण त्यानंतर सुरक्षा दलांनी गोळीबार सुरूच ठेवल्याने जवानांनाही त्याचे प्रत्युत्तर द्यावे लागले.

Web Title: Shopian a terrorist killed in encounter