मोदींचा 'शंभर नंबरी' दावा खोटा

मोदींचा 'शंभर नंबरी' दावा खोटा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिक्किममधील पाकयोंग विमानतळाचे उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाला आज 100 वे विमानतळ मिळाले आहे, असा दावा केला होता. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दावा खोटा असल्याचे समोर आले. मोदींनी विमानतळाचा आकडा पूर्णपणे चुकीचा सांगितल्याचे एका अहवालातून उघडकीस आले.

पाकयोंग विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी म्हणाले होते, की ''आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. या विमानतळामुळे देशाला 100 वे विमानतळ मिळाले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात विमानतळांची कामे वेगाने पूर्ण होत आहे''. मात्र, मोदींनी विमानतळांचा सांगितलेला आकडा पूर्णपणे चुकीचा आहे. देशातील एकूण विमानतळांची संख्या सव्वाशेहून अधिक आहे. पंतप्रधान मोदींनी फक्त देशातील कार्यान्वित असलेल्या विमानतळांचा आकडा सांगितला, असे लक्षात घेतले तरीदेखील आकडेवारी जुळत नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी आणि मोदींनी सांगितलेली आकडेवारी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे.

दरम्यान, पाकयोंग हे देशातील शंभरावे विमानतळ आहे, हा पंतप्रधान मोदींचा दावा नागरी विमान उड्डाण संचलनालयच्या (डीजीसीए) आकडेवारीनेही खोटा ठरवला आहे. यातील विशेष बाब म्हणजे या दोन्ही संस्था सरकारच्या अखत्यारित येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com