Video: ‘जाऊ बाई जोमात, बाकी सारे कोमात’; भांडता-भांडता चक्क पडल्या गटारीत

भांडण इतके विकोपाला गेले की भांडता-भांडता दोघी चक्क गटारीत पडल्या.
videp
videpsakal

घरगुती भांडण ही साधारण गोष्ट आहे. अनेकदा हे घरगुती भांडण विकोपालाही जातं. असे अनेक उदाहरण तुम्ही बघितले आहे. सध्या असाच एक घरगुती भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. (sisters-in-law fight publicly on property dispute in rajasthan)

राजस्थान येथील अजमेरला संपत्ती वरुन संघर्ष सुरूअसणाऱ्या दोन जावांमध्ये चांगलेच भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की भांडता-भांडता दोघी चक्क गटारीत पडल्या. तरीसुद्धा यांच भांडण सुरुच होते.या भांडणात त्या एकमेकींना चक्क मारत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जेव्हा या दोन जावा गटारीत भांडत होत्या तेव्हा एक माणूस त्यांचे भांडण सोडवण्याकरीता त्यांच्या मधे गेला तर तेव्हा तेथील एका पुरुषाने त्याला चक्क लाथांनी मारले. तरीसुद्धा महिलांनी आपले भांडण आणि मारहाण सुरुच ठेवली. याशिवाय परीसरातील लोक सुद्धा त्यांना भांडू नका किंवा मारहाण करू नका असा सल्ला देत होते मात्र या जावा कुणाचंच ऐकत नव्हत्या.

अखेर ही घटना पोलिसांकडे गेली तेव्हा पोलिसांनी या दोन्ही महिलेविरुद्ध तक्रार नोंदवली. सिसीटिव्हीच्या आधारे या घटनेचा तपास पोलिस करीत आहे. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com