शोपियॉंमध्ये जवानाचे अपहरण 

पीटीआय
शुक्रवार, 15 जून 2018

दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यातून आज लष्कराच्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले. या घटनेची स्थानिक पोलिस आणि लष्कर चौकशी आणि तपास करत आहेत. 

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यातून आज लष्कराच्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले. या घटनेची स्थानिक पोलिस आणि लष्कर चौकशी आणि तपास करत आहेत. 

औरंगजेब असे या जवानाचे नाव असून, तो ईदसाठी सुटी घेऊन घरी जात होता. त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्याने जाणारी एक गाडी थांबवून औरंगजेबला त्याच्या गावापर्यंत सोडविण्याची चालकाला विनंती केली. या गाडीतून जात असताना दहशतवाद्यांनी ती अडविली आणि औरंगजेबचे अपहरण केले. हा राष्ट्रीय रायफल्स तुकडीचा जवान आहे. 

बंदीपोरामध्ये दोन दहशतवादी मारले 
जम्मू-काश्‍मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यामध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांबरोबर चकमक होऊन त्यात दोन दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक जवानही हुतात्मा झाला. बंदीपोरामधील पनार जंगलात ही घटना घडली. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातही आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळून गेले. या चकमकीत कोणतीही हानी झाली नाही. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबविली जात आहे.

Web Title: Soldier Abducted From Kashmir's Pulwama While On Leave