'अधिकाऱयांचे शूज पॉलिश करायला लागतात'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नवी दिल्ली- लष्करातील अधिकाऱयांचे शूज पॉलिश करावे लागतात, असा आरोप लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी व्हिडिओमधून केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर त्यांनी आज (शुक्रवार) अपलोड केला आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेजबहादूर यादव यांनी मिळत असलेल्या अन्नाबाबत व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली.

नवी दिल्ली- लष्करातील अधिकाऱयांचे शूज पॉलिश करावे लागतात, असा आरोप लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी व्हिडिओमधून केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर त्यांनी आज (शुक्रवार) अपलोड केला आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेजबहादूर यादव यांनी मिळत असलेल्या अन्नाबाबत व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली.

'देशातील सरकारी शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. सगळे सण उत्सव ते कुटूंबासोबत साजरे करतात, परंतु आम्हाला कुटुंबापासुन दूर राहुनही सोयी सुविधांसाठी झगडावे लागत आहे,' अशी व्यथा मांडणारा केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान (सीआरपीएफ) जत सिंह व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱया दिवशी व्यक्त केली.

तिसऱया दिवशी लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी तक्रारीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामुळे सलग तिन दिवस लष्करातील तक्रारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ लागल्या आहेत. देशातील नागरिकही जवानांच्या पाठीमागे उभे राहिल्याने वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी म्हटले आहे की, 'लष्करातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असून, त्यांचे शूज पॉलिश करून घेतात. याबाबत व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहून याबाबत कळविले होते. पंतप्रधान कार्यालयाने चौकशीबाबत उत्तरही दिले होते. चौकशीला सुरवात झाल्यानंतर माझ्या त्रासामध्ये वाढ झाली. मला होत असलेल्या त्रासाबाबत कळविले, यामध्ये माझी काय चूक आहे. मला त्रास दिला तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही. अथवा कोणा अधिकाऱयाचे नाव घेणार नाही. परंतु, सेवानिवृत्त होताना याबाबत खुलासा करेल.'

दरम्यान, जवानाने केलेल्या तक्रारीची आम्ही दखल घेतली असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे लष्कराने म्हटले आहे.

देश

पणजी (गोवा) : विधानसभा पोट निवडणूक शांततेत होईल असे वाटत असतानाच पणजी मयदारसंघातील टोंक-करंजाळे येथील मतदान केंद्र क्रमांक...

04.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आठवडाभरात झालेल्या दोन रेल्वे दुर्घटनांची जबाबादारी स्वीकारत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...

03.36 PM

बेळगाव : विद्यार्थ्यांनी देशभक्तीची गाणी वर्षातून दोन तीन वेळा फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशीच केवळ न म्हणता...

01.48 PM