उत्तर प्रदेशातील प्रचारापासून प्रियांका, सोनिया गांधी दूर

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

लखनौ- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी समजावादी पक्षाचा "हात' कॉंग्रेसने धरला आहे. एकत्रित प्रचार सुरू झाला असला, तरी कॉंग्रेसच्या "स्टार' प्रचारक प्रियांका गांधी-वद्रा व पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी प्रचारापासून दूरच राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या दोन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीच्या नियोजनानुसार प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघात 13 फेब्रुवारापासून तीन दिवस व अमेठीत 16 पासून प्रचार करणार होत्या. पण समाजवादी पक्षाशी आघाडीबाबत गोंधळाची स्थिती असल्याने कॉंग्रेसच्या या वरिष्ठ नेत्या प्रचारापासून अलिप्तच राहिल्या आहेत. रायबरेलीतील निवडणुकीला सहा दिवस उरले असून आघाडीत तीन जागांवरून आघाडीत संभ्रम आहे. उच्छाहर व सरेनी मतदारसंघात कॉंग्रेस व समाजवादी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठारले आहेत. बचर्वामधील समाजवादी पक्षाच्या आमदरांना तिकीट नाकारल्याने ते अपक्ष लढत आहेत.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी रायबरेली 17 फेब्रुवारीला येणार आहेत. त्यांच्या दोन सभा या वेळी होणार आहेत. पण प्रियांका गांधी व सोनिया गांधी प्रचारात उतरणार नसल्याचे जवळजवळ निश्‍चित झाले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी आज सांगितले.

Web Title: Sonia Gandhi and priyanaka gandhi away from uttar pradesh campaigning