सोनिया गांधी उपचारानंतर भारतात परतल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अमेरिकेतील उपचारानंतर आज (शुक्रवार) भारतात परतल्या आहेत.

सोनिया गांधी या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी 16 मार्च रोजी अमेरिकेला रवाना झाल्या होत्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा त्यांच्या आईसोबत होते. उचारानंतर दोघेही आज भारतात परतले आहेत.

सोनिया गांधी प्रकृती अस्वस्थामुळे नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही दिसल्या नव्हत्या. या निवडणुकांमधील पराभवानंतर पक्षात नेतृत्वावरून जोरदार चर्चा होत आहे. दोघेही आज भारतात परतल्यामुळे राजकीय बदलांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Web Title: Sonia Gandhi back in India after health check up