सोनियांच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधी पवार यांच्या शेजारी

बुधवार, 23 मे 2018

बंगळुरू: जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली.

बंगळुरू: जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी त्याचबरोबर देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या शपथविधीवेळी विरोधकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. २०१९ लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना भाजप विरोधक एकत्र येत आहेत. या कार्यक्रमादरम्यान एक महत्वाची घटना घडली. शपथविधीसाठी उपस्थितीत असलेले राहुल गांधी बसण्यासाठी आपल्या आसनाकडे जात असताना सोनिया गांधी यांनी राहुल यांना इशारा करून शरद पवार यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. यानंतर राहुल पवार यांच्या शेजारी जाऊन बसले. दोघांनी बराच वेळ चर्चा केली. सोनिया यांनी राहुल यांना शरद पवार यांच्या शेजारी बसायला सांगितल्यामुळे येत्या काळातील समीकरणांचा अंदाज बांधला जात आहे. 

कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी आज शपथ घेतली. शक्तीसौध विधानसौधच्या समोर सायंकाळी 4.30 वाजता शपथविधीचा समारंभ पार पडला. देशातील विविध पक्षांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी 80 बाय 40 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. शिवाय सुमारे एक लाखापेक्षा अधिक लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. 

 

Web Title: Sonia told Rahul Gandhi to sit near Sharad Pawar