सौरभ गांगुलीला जिवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मदिनापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गांगुली याने उपस्थित राहू नये; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याचे गांगुलीने सांगितले.

कोलकता = भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याला निनावी पत्रातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मदिनापूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गांगुली याने उपस्थित राहू नये; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याचे गांगुलीने सांगितले.

हे निनावी पत्र शनिवारी प्राप्त झाल्याचे त्याने सांगितले. गांगुली हा सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. मदिनापूर जिल्ह्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही, असे गांगुलीने सांगितले.