जोर से बोलो "जंगलराज': तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

पाटना (बिहार) - केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा संदर्भ देत "या आकडेवारीत बिहारचे स्थान शोधून दाखवा‘ असा प्रश्‍न करत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी "जोर से बोलो जंगलराज‘ असे म्हणत केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहार म्हणजे देशातील गुन्हेगारीची प्रमुख राज्ये असल्याची नेहमीच चर्चा केली जाते. मात्र केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार धक्कादायक बाब समोर आली आहे. या यादीतून बिहारमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानपेक्षा कमी बलात्काराचे गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. याच आकडेवारीचा तेजस्वी यादव यांनी संदर्भ दिला आहे. ट्‌विटरद्वारे त्यांनी म्हटले आहे की, "जंगलराजवाल्यांनो जरा शोधा बिहारचा क्रमांक कोठे आहे? तुमचे आकडे तुम्हाला आरसा दाखवत आहेत.‘

केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाच्या आकडेवारीनुसार पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये 2015 या वर्षात मध्यप्रदेशमध्ये 4391, महाराष्ट्रात 4144, राजस्थानमध्ये 3644 तर त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये केवळ 3025 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. या यादीत ओडिशा, दिल्ली, आसाम, चंदीगढ, केरळ, बंगाल, हरियाना नंतर बिहारचा क्रमांक लागतो. बिहारमध्ये 2015 या एका वर्षात बलात्काराचे केवळ 1041 गुन्हे झाल्याचे दिसून येत आहे.