' "सप'तील 'फॅमिली ड्रामा' 'युपी'च्या हिताचा नाही'

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षात सुरु असलेले कौटुंबिक कलह हे उत्तर प्रदेशच्या हिताचे नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाने केली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षात सुरु असलेले कौटुंबिक कलह हे उत्तर प्रदेशच्या हिताचे नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना बहुजन समाज पक्षाचे नेते सुधींद्र भंडोरिया म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये "फॅमिली ड्रामा' सुरू आहे. दररोज ते नवनवीन नाटके करत आहेत. त्यातून त्यांना उत्तर प्रदेशमधील जनतेची काळजी नसल्याचे दिसून येते.' तसेच जगासमोर समाजवादी पक्षातील घाण स्वच्छ करण्यात येत असून त्यामध्ये कोणालाही रस नसल्याची टीकाही भंडोरिया यांनी केली. समाजवादी पक्षाचा उत्तरप्रदेशमधील मुख्यमंत्र्यापदाचा आगामी चेहरा कोण असेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी एक बैठक बोलाविली होती. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित राहिले नाहीत.