श्रीलंकेच्या नौदलाने केली भारतीय मच्छीमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने केली भारतीय मच्छीमारांना अटक

रामेश्‍वर : श्रीलंकेच्या हद्दीत नेदुनथीवूजवळ मासेमारी करणाऱ्या तमिळनाडूच्या दहा मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने आज अटक केली, अशी माहिती मच्छीमार विभागाचे सहायक संचालक गंगाधरन यांनी येथे दिली.

अटक करण्यात आलेले सर्व मच्छीमार हे नागापट्टीनम जिल्ह्यातील अक्कारापेट्टइ येथील आहेत. नेदुनथीवूजवळ ते सर्व जण मासेमारी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे, असे ते म्हणाले. त्या सर्वांना कानकेसनथुराइ येथे टॉलरसह नेण्यात आले आहे. 14 नोव्हेंबरपासून तमिळनाडूच्या 1600 मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने मासेमारीस परवानगी न देता जबरदस्तीने परत पाठविले आहे; मात्र त्या सर्वांची जाळी त्यांनी जप्त केली आहेत. दरम्यान, सात नोव्हेंबरपूर्वी पुड्डूकोट्टाइ जिल्ह्यात चार मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com