श्रीरामसेना प्रमुख मुतालिकच्या गोवा प्रवेशबंदीत वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असून, त्यांच्या प्रवेशामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे, असे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

पणजी - श्रीरामसेना प्रमुख प्रमोद मुतालिक याच्या गोवा प्रवेशबंदी मुदत आणखी 60 दिवसांनी वाढविली आहे. ही बंदी त्याला, तसेच त्यांच्या समर्थकांनाही उद्या 17 जानेवारीपासून लागू होणार आहे.

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असून, त्यांच्या प्रवेशामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे, असे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

मुतालिक याने सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील प्रवेशबंदीला आव्हान दिले आहे दिले आहे. ही याचिका 3 जानेवारीला सुनावणीस आली असता राज्य सरकारला बाजू मांडण्यास चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रमोद मुतालिक याने विधाने करून गोमंतकीयांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले होते. त्यांच्या प्रवेशामुळे राज्यातील पर्यटनावरही परिणाम होऊ शकतो.

पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही मुतालिक व श्रीराम सेनेच्या समर्थकांनी केलेली प्रक्षोभक विधाने गोव्यातील जनतेच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशबंदीत वाढ करण्याची शिफारस केली होती.

Web Title: Sri Ram Sene's Muthalik banned from entering Goa for 60 days