काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांकडून सुरक्षा जवानांवर दगडफेक

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

उशिरापर्यंत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे शहरातील वाहतूक आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला. पुलवामा येथील अटक केलेल्या विद्यार्थ्यांना सोडून द्यावे आणि संबंधित जवानांवर कारवाई करावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे

श्रीनगर - येथील वर्दळीच्या मौलाना आझाद रस्त्यावरील लाल चौकात एस. पी. उच्च माध्यमिक विद्यालयाचे निदर्शक विद्यार्थी, महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि संरक्षण दलाच्या जवानांमध्ये मंगळवारी (ता. 9) संघर्ष उडाला. विद्यार्थ्यांना काबूत आणण्यासाठी जवानांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. मात्र, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पुलवामा येथील सरकारी पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर संरक्षण दलाच्या जवानांनी हातबॉंब टाकल्याच्या निषेधार्थ काश्‍मीरमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने सुरूच आहेत. लाल चौकात निदर्शक विद्यार्थ्यांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. जवानांनीही त्यांच्यावर दगडफेक केली. उशिरापर्यंत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे शहरातील वाहतूक आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला. पुलवामा येथील अटक केलेल्या विद्यार्थ्यांना सोडून द्यावे आणि संबंधित जवानांवर कारवाई करावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

टॅग्स