उपचाराअभावी मुलाचा पित्याच्या खांद्यावर मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

कानपूर - वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने बारा वर्षांच्या मुलाचा उपचारासाठी रुग्णालयात नेणाऱ्या वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
 

कानपूर - वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने बारा वर्षांच्या मुलाचा उपचारासाठी रुग्णालयात नेणाऱ्या वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
 

कानपूरमधील फझलजंग परिसरातील अंश सुनील कुमार नावाच्या 12 वर्षांच्या मुलाला खूप ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस खासगी रुग्णालयातील उपचारानंतर वडिलांनी अंशला शहरातील स्वरूपनगर परिसरातील हॅलेट रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्‍टरांनी अंशला बालकांच्या विभागात नेण्यास सांगितले. त्यामुळे सुनील यांनी अंशला खांद्यावर टाकून बालकांच्या विभागात नेले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर अंशला मृत घोषित केले. "तो सहाव्या वर्गात शिकत होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. जर त्याला घेऊन मी रुग्णालयाच्या बालक विभागात फक्त दहा मिनिटे लवकर पोचलो असतो, तर त्याला वाचवता आले असते,‘ असे डॉक्‍टरांनी सांगितले, अशी माहिती अंशच्या वडिलांनी दिली. हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा आहे. त्यांनी माझ्या मुलावर उपचार केले नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी साधे स्ट्रेचरही पुरविले नाही. मी माझ्या खांद्यावर मुलाला टाकून इकडून तिकडे फिरत होतो, असेही अंशच्या वडिलांनी सांगितले. 

टॅग्स