अल्पवयीन विद्यार्थी 22 वर्षीय शिक्षिकेबरोबर सैराट...

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

या शिक्षिकेच्या कुटूंबीयांनी या मुलाच्या कुटूंबीयांनीच एका जुन्या प्रकरणाचा सूड घेण्यासाठी हे कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे येथील पोलिसही चक्रावले आहेत. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असल्याने दोन्ही कुटूंबांचा विरोध टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे...

बरेली - एक 14 वर्षीय मुलगा त्याच्या 22 वर्षीय शिक्षिकेबरोबर पळून गेल्याची घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घरातून पळून जाताना त्याने आठ हजार रुपये आणि दागिनेही नेल्याचेही निष्पन्न झाले आहे. ही शिक्षिका संबंधित मुलगा शिकत असलेल्या शाळेच्या मालकांचीच मुलगी आहे. दरम्यान, या प्रकरणी शिक्षिकेच्या कुटूंबीयांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे; तर या शिक्षिकेकडूनच मुलास फूस लावण्यात आल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

"माझा मुलगा घरामधून पैसे व दागिने चोरुन पळून गेला आहे. त्याच्या शाळेतील शिक्षिकेने फूस लावल्यानेच त्याने असे केले आहे. या महिलेचे चारित्र्य चांगले नाही. तिनेच माझ्या मुलास जाळ्यात ओढून गुन्हा करावयास भाग पाडले आहे. मी आता असहाय्यपणे माझ्या मुलास शोधत आहे. त्याचे वय लक्षात घेता त्याच्यामध्ये असे कृत्य करण्याचे धाडस वा मानसिक तयारी नाही,'' असे रणवीर या मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे.

दरम्यान, या शिक्षिकेच्या कुटूंबीयांनी या मुलाच्या कुटूंबीयांनीच एका जुन्या प्रकरणाचा सूड घेण्यासाठी हे कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे येथील पोलिसही चक्रावले आहेत. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असल्याने दोन्ही कुटूंबांचा विरोध टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

टॅग्स

देश

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर प्रकरणावरून आज (शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर...

01.42 PM