विद्यार्थ्याला 'सेल्फी विथ एक्झाम' पडली महागात

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

अहमदाबाद (गुजरात): माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सेल्फीने जगभरातील नेटिझन्सनला वेड लावले आहे. सेल्फी कोठे आणि कशी काढावी? याचे भान न राहिल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर येथील एका विद्यार्थ्याला पुढील दोन वर्षे बारावीच्या परिक्षेला मुकावे लागले आहे.

पोरबंदरमध्ये परिक्षा हॉलमध्ये परिक्षा सुरू होती. बारावीची परिक्षा देत असलेल्या वत्सल करामता (17) याने परिक्षा केंद्रावर सेल्फी घेतली. संबंधित छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. परिक्षा हॉलमध्ये सेल्फी काढल्यामुळे गुजरात परिक्षा विभागाने पुढील दोन वर्षे परिक्षा देण्यावर बंदी घातली आहे. यामुळे वत्सलला सेल्फी चांगलीच महागात पडली आहे.

परिक्षा विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले की, 'वत्सलने मार्चमध्ये सेल्फी काढली होती. सीसीटीव्ही फुटेजची तपसाणी करताना ही घटना उघडकीस आली. यामुळे वत्सलवर कारवाई करण्यात आली आहे. मार्च 2019 पर्यंत परीक्षा देण्यास त्याच्यावर बंदी घातली आहे. 2014 पासून गुजरात परिक्षा विभाग नियमितपणे परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे.'

दरम्यान, कोणत्याही वाईट हेतूने हा प्रकार केला नाही. परंतु, चुकून नियम मोडला गेल्याची कबुली वत्सलने दिली आहे. गुजरात परिक्षा विभागाच्या इतिहासात प्रथम अशा प्रकारची कारवाई झाली आहे.