निकालानंतर 12 विद्यार्थ्यांची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

सतनासह छतारपूर, गुणा, इंदोर, बालघाट, ग्वालिअर, तिकामगड, भिंड, जबलपूर व भोपाळ जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर काही तासांतच आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे

भोपाळ - नुकत्याच जाहीर झालेल्या 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यात सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. सतना जिल्ह्यात 10 वी आणि 12 वीची परीक्षा दिलेल्या बहीण-भावाने नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

सतनासह छतारपूर, गुणा, इंदोर, बालघाट, ग्वालिअर, तिकामगड, भिंड, जबलपूर व भोपाळ जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर काही तासांतच आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळमधील नमन कडवे या दहावीतील विद्यार्थ्याने 90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने विषारी इंजेक्‍शन टोचून घेत आत्महत्या केली. नमन या परीक्षेत 74.4 टक्कांनी उत्तीर्ण झाला होता. छतारपूर येथील बारावीची परीक्षा दिलेल्या विकास रावत काही विषयात नापास झाल्यामुळे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

. . . . .