कोसळलेल्या 'सुखोई-30'चा ब्लॅक बॉक्‍स सापडला

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

तेजपूर : अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या हवाई दलाच्या सुखोई-30 या विमानाचा ब्लॅक बॉक्‍स आज आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विमानाने 23 मे रोजी तेजपूर येथील हवाई दलाच्या तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. नंतर ते कोसळल्याचे स्पष्ट झाले.

विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या कामेंग जिल्ह्यात आढळून आले होते. दरम्यान, याच्या शोधासाठी निघालेले एक पथक घटनास्थळी पोचले असून, त्यांना विमानाचा ब्लॅक बॉक्‍स आढळून आला असून, इतर शोधकार्य सुरू आहे. मात्र, विमानात असलेल्या दोन वैमानिकांविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे हवाई दलाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.