फक्त गोहत्याच बंद करा : रामदास आठवले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

संपूर्ण देशात गोहत्या बंदी करण्याबाबत विचार सुरु  असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोहत्या बंदीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, फक्त गोहत्या बंदीच करावी, इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी आणू नये असेही, त्यांनी सुचविले आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण देशात गोहत्या बंदी करण्याबाबत विचार सुरु असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोहत्या बंदीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, फक्त गोहत्या बंदीच करावी, इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी आणू नये असेही, त्यांनी सुचविले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले, 'गाय हिंदूंसाठी पवित्र प्राणी आहे. त्यामुळे आपली संस्कृती जपण्यासाठी देशभर गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा. मात्र जर इतर प्राण्यांच्या हत्येवरही बंदी आणली तर आपले शेतकरी बैल किंवा इतर प्राण्यांचा व्यापार करू शकणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल. जर शेतकरी त्यांच्या गायीसाठी पैसे खर्च करू शकत नसतील, तर सरकारने अशा गायींची जबाबदारी घेण्याची तरतूद करावी. त्यामुळे शेतकऱ्यांवरील ताण कमी होईल.'

गोहत्येच्या संशयावरून अलिकडच्या काळात दलितांवर झालेल्या अत्याचाराबाबत बोलताना आठवले म्हणाले, "गोहत्या होत असल्याचा संशय आला तर पोलिसांना कळवावे, ते योग्य तो तपास करतील. एखाद्या प्रकरणात पुरेशी माहिती आणि पुरावे असल्याशिवाय दलितांवर हल्ले करणे अन्यायकारक आहे.'

Web Title: Supprt ban on cow slaughter, not of other cattle : Ramdas Athawale