केरळमधील "लव्ह जिहाद' प्रकरणांची चौकशी करा: सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

शफीन जहान याने गेल्या डिसेंबर महिन्यात अखिलाशी लग्न केले होते. केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह बेकायदेशीर ठरविल्यानंतर जहान याने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधिज्ञ कपिल सिब्बल व इंदिरा जयसिंग हे जहान याची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत आहेत

नवी दिल्ली - केरळमधील एक हिंदु महिला इस्लाम धर्म स्वीकारत मुस्लिम तरुणाशी विवाहबद्ध झाल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेस (एनआयए) या प्रकरणी "लव्ह जिहाद'च्या असलेल्या शक्‍यतेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या तपासाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर व्ही रवींद्रन परीक्षण करणार आहेत.

केरळमधील अखिला अशोकन या महिलेने इस्लाम स्वीकारत एका मुस्लिम तरुणाशी केलेले लग्न हे अशा स्वरुपाचे एकमेव प्रकरण नसल्याचे प्रथमदर्शनी करण्यात आलेल्या पाहणीमध्ये आढळून आल्याचे एनआयएने न्यायालयास सांगितले आहे. पालकांशी मतभेद असलेल्या अन्य हिंदु तरुणींचे धर्मांतर घडविण्यामध्येही या प्रकरणामधील आरोपींचा सहभाग या तपासामध्ये दिसून आला आहे.

शफीन जहान याने गेल्या डिसेंबर महिन्यात अखिलाशी लग्न केले होते. केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह बेकायदेशीर ठरविल्यानंतर जहान याने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधिज्ञ कपिल सिब्बल व इंदिरा जयसिंग हे जहान याची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत आहेत.