सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची होणार उचलबांगडी ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची आज (शुक्रवार) भेट घेणार आहेत.   

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची आज (शुक्रवार) भेट घेणार आहेत.   

supreme court of india

दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आग्रही आहेत. दीपक मिश्रा यांना हटविण्यासाठी राज्यसभेच्या 67 खासदारांची स्वाक्षरी असलेले पत्र नायडू यांच्याकडे देणार आहेत. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा निकाल दिला. त्यानंतर काँग्रेसने या निर्णयावर संशय व्यक्त करत हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेतील 'सॅड लेटर डे' आहे, अशा शब्दांत सांगितले. 

Web Title: Supreme Court Key opposition meet at 11 am to discuss motion to remove CJI Dipak Misra