गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट; सुप्रीम कोर्टानं जाफरींची याचिका फेटाळली

Narendra Modi Zakia Jaffrey
Narendra Modi Zakia Jaffreyesakal
Summary

राज्यात दंगली उसळल्या त्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी (Ehsan Jafri) यांच्या पत्नी झाकिया जाफरी (Zakia Jaffrey) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) आज निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एसआयटीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत योग्यता नसल्याचं म्हटलंय.

2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी (Gujarat Violence Case) एसआयटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) इतर अनेकांना क्लीन चिट दिली होती, त्याविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयानं आपला निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.

Narendra Modi Zakia Jaffrey
महाविकास आघाडी सरकार पडतंय, त्याचं मला अजिबात दुःख नाही : राजू शेट्टी

28 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील गुलमर्ग सोसायटीमध्ये गुजरात दंगलीत एहसान जाफरीसह 69 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एसआयटीनं 64 जणांना क्लीन चिट दिली होती, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव आहे. एसआयटीच्या या क्लीन चिटला झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. राज्यात दंगली उसळल्या त्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. दरम्यान, झाकिया जाफरी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, सीटी रविकुमार यांचाही समावेश आहे. या लोकांनी नरेंद्र मोदींच्या सहभागाबाबत युक्तिवाद केला नाही. तर, दुसरीकडं एसआयटीनं झाकिया जाफरी यांच्या याचिकेला विरोध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com