पाकिस्तानी मुलीला "व्हिसा' मंजूर - स्वराज

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

डोळ्यांचा कर्करोग झालेल्या अनामत फारुख (वय 5) या मुलीवर भारतात उपचार करण्यासाठी "व्हिसा' देण्याची विनंती तिच्या पालकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार अनामत हिला वैद्यकीय "व्हिसा' मंजूर करण्याचे आदेश भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्तांना दिले असल्याचे स्वराज यांनी सोमवारी "ट्विट' करून स्पष्ट केले

नवी दिल्ली - डोळ्यांच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या पाच वर्षांच्या पाकिस्तानी मुलीला भारतातील उपचारांसाठी वैद्यकीय "व्हिसा' मंजूर करण्याचा आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयाला दिला. वैद्यकीय उपचार करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती संबंधित मुलीच्या पालकांनी स्वराज यांच्याकडे केली होती.

डोळ्यांचा कर्करोग झालेल्या अनामत फारुख (वय 5) या मुलीवर भारतात उपचार करण्यासाठी "व्हिसा' देण्याची विनंती तिच्या पालकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार अनामत हिला वैद्यकीय "व्हिसा' मंजूर करण्याचे आदेश भारताच्या इस्लामाबादमधील उच्चायुक्तांना दिले असल्याचे स्वराज यांनी सोमवारी "ट्विट' करून स्पष्ट केले होते. तसेच, शहरयार नावाच्या पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी "व्हिसा' मंजूर करण्यात आला आहे, असेही स्वराज म्हणाल्या.