स्वच्छतागृह असलेल्या कुटुंबाला 1 किलो टोमॅटो फ्री!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

बंगळूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटकमध्ये स्वच्छतागृह असलेल्या कुटुंबाला एक भाजीपाला महिला विक्रेती 1 किलो टोमॅटो मोफत देत आहे. शरनम्मा बकर असे त्या महिलेचे नाव आहे.

मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत योजनेला आपला हातभार लागावा यासाठी शरनम्मा या कोप्पल भागातील गावांमध्ये 1 किलो टोमॅटो मोफत देतात. मोदींनी स्वच्छ भारत योजना सुरू करण्यापूर्वी परिसरातील अनेकजण उघड्यावर शौचालयला जात होते. परंतु, नागरिकांमध्ये हळूहळू जागृकता होऊ लागली असून, शौचालय उभारू लागले आहेत.

शरनम्मा या हातगाडीवरून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ज्या कुटुंबाकडे शौचालय आहे, त्या कुटुंबाला त्या 1 किलो टोमॅटो मोफत देतात. या योजनेमुळे स्वच्छ भारत योजनेची जाहिरताही होत असून, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजू लागले आहे. परिसरातील विविध कुटुंबांनी स्वतःची शौचालये उभारली आहेत.

शरनम्मा यांच्या पतीचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. त्यांची मुलगी व त्या दोघीच राहतात. आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या पैशांमधून त्या मुलीचे शिक्षण करतात. शिवाय, देशासाठी काही तरी करायचे म्हणून त्या 1 किलो मोफत टोमॅटो योजना राबवितात. शरनम्मा यांनी सुरू केलेल्या या योजनेमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. भारतामधील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असायला हवे, यासाठी आपण मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी झाल्याचे शरनम्मा यांनी 'एनडीटीव्ही'शी बोलताना सांगितले.