कार्ड स्वाइप करताच रेल्वे पास हातात!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मुंबई - चलन चणचणीत रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करून रेल्वे पास काढण्याची सेवा नवीन वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या 624; तर पश्‍चिम रेल्वेच्या 324 तिकीट खिडक्‍यांवर ही सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील रेल्वे अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी दिली.

जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर सर्वप्रथम लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना स्वाइप मशिनद्वारे तिकीट काढून देण्याची सेवा सुरू करण्यात आली. नव्या वर्षात उपनगरी रेल्वे प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास देण्यासाठी कार्ड स्वाइप सेवा देण्यात येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ती सुरू होईल. लोकलच्या तिकिटांसाठी मात्र या सेवेचा वापर करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.