तुम्हाला वाटले तर पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई : 'रुस्तुम' या चित्रपटासाठी अभिनेता अक्षय कुमारला यावर्षी 'उत्कृष्ट अभिनेत्या'चा राष्ट्रीय पुरस्काराने प्राप्त झाला आहे. मात्र या पुरस्कारावर काही जणांनी केलेल्या टीकेनंतर तो नाराज झाला आहे. 'मी 26 वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तो ही तुम्ही (परत) घेऊ शकता', असे म्हणत अक्षयने नाराजी व्यक्त करत पुरस्कार परत करण्याची तयारी दर्शविली आहे.

चित्रपटातील धाडसी दृश्‍ये चित्रीत करणाऱ्या 'मुव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशन'च्या कार्यक्रमाला अक्षय उपस्थित होता. एशियन हार्ट इन्स्टिट्युट आणि अक्षय कुमार यांनी मिळून 2017-18 साठी 370 स्टंटमॅन्सचा (धाडसी दृश्‍ये करणारे कलाकार) विमा उतरवला आहे. यावेळी अक्षय बोलत होता. तो म्हणाला, 'मी हे सारे गेल्या 25 वर्षांपासून पाहात आहे. कोणाला तरी पुरस्कार मिळतो त्यावेळी त्याच्याविषयी चर्चा होते. हे काही नवीन नाही. काही जण नेहमीच वाद निर्माण करतात. त्याला मिळायला नको होता. दुसऱ्या कोणाला तरी मिळायला हवा होता, असे म्हणत लोक चर्चा करतात. ठीक आहे. मी 26 वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तो ही परत घ्या.'

अक्षय कुमारऐवजी 'दंगल'मधील भूमिकेबद्दल आमीर खानला हा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी टीका करण्यात येत आहे. पुरस्कार देणारे जुरीचे प्रमुख प्रियदर्शन यांनी अक्षयला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांच्यावरही टीका केली जात आहे.

Web Title: Take it back if you want, says Akshay Kumar on National Award win