गर्भवती महिलेला दिलेला तलाक बेकायदेशीर : रहमान खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली - तोंडी तलाक पीडित महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर "गर्भवती महिलेला दिलेला तलाक इस्लाममधील कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. या प्रकरणी ऑल इंडियन मुस्लिम लॉ बोर्डाने तातडीने कारवाई करावी', अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते के. रहमान खान म्हणाले, "मुस्लिम समुदायाने अशा प्रकारांचे (तोंडी तलाक) मूल्यमापन करावे असे मला वाटते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या प्रकाराची दखल घ्यावी आणि "तोंडी तलाक' पद्धतीचा गैरवापर करणाऱ्यावर कडक कारवाई करावी.' दोन अपत्यांची आई असलेल्या एका तोंडी तलाक पीडित महिलेने मोदींना पत्र लिहिले आहे. दोन अपत्यांची आई असलेल्या या महिलेला तिसऱ्यांदा दिवस गेले होते. तिसऱ्यांदा मुलगी होईल या भीतीने तिच्या पतीने तिला गर्भपात करण्याचा आग्रह धरला. मात्र त्यास नकार मिळाल्यानंतर पतीने निदर्यपण मारहाण करत तोंडी तलाक दिला आणि नंतर रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिने थेट मोदींकडेच आपली व्यथा मांडली. याबाबत बोलताना संबंधित महिलेने शरियत न्यायालयात जावे, असा सल्ला खान यांनी दिला.

'या प्रकरणातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ती महिला गर्भवती आहे. गर्भवती महिलेला दिलेला तलाक इस्लाममधील शरिया कायद्यानुसार कायदेशीर मानला जात नाही', असे खान म्हणाले. मुस्लिम लॉ बोर्डाने या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणीही खान यांनी यावेळी केला.