श्रीलंकेच्या नौदलाने केली पाच मच्छीमारांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

रामेश्‍वर : श्रीलंकेच्या हद्दीत नेदुथीवू येथे मासेमारी करणाऱ्या पाच भारतीय मच्छीमारांना आज श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली. श्रीलंकेच्या नौदलाने या मच्छीमारांच्या बोटी जप्त केल्या असून, त्यांना मन्नर येथे श्रीलंकेच्या नौदलाच्या तळावर नेण्यात आले आहे, असे मच्छीमारांचे सहायक संचालक मनिकंदन यांनी सांगितले.

कचैथईवूच्या परिसरात मच्छीमारांच्या एका गट 50 बोटींसह कटछथीवू येथे मासेमारी करीत होता, त्या वेळी श्रीलंकेच्या नौदलाने त्यांचा पाठलाग केला. मात्र, सर्व बोटी या सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आल्याचे रामेश्‍वर फिशरमन असोसिएशनचे एस. एमिरेट यांनी सांगितले. नागापट्टनम जिल्ह्यात आठ ऑक्‍टोबरला श्रीलंकेच्या नौदलाने दहा मच्छीमारांना अटक केली होती.

टॅग्स