"त्या' टी स्टॉलचे पर्यटनस्थळात रूपांतर

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

मोदी यांचे जन्मस्थळ असलेल्या वाडनगर या गावास आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्याची एक योजना हाती घेण्यात आली असून, त्याअंतर्गत हा टी स्टॉल पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाणार आहे

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बालपणी ज्या ठिकाणी चहाची विक्री करत होते, तो टी स्टॉल आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

वाडनगरमधील रेल्वे स्थानकावर हा टी स्टॉल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी एककाळी आपल्या वडिलांसोबत तेथे चहाची विक्री करत. मोदी यांचे जन्मस्थळ असलेल्या वाडनगर या गावास आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्याची एक योजना हाती घेण्यात आली असून, त्याअंतर्गत हा टी स्टॉल पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाणार आहे. या अनुषंगाने केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय तसेच, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली.

मोदी यांच्या जन्मगावाबरोबर वाडनगर हे विविध ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असा शर्मिष्टा तलाव येथे असून, पुरातत्त्व विभागाने येथे एक बौद्ध मठ शोधून काढल्याची माहिती शर्मा यांनी दिली.