जावयाच्या हत्येसाठी सासऱयाकडून एक कोटीची सुपारी

Telangana honour killing: Amruthas father hired killers for Rs 1 crore 7 arrested
Telangana honour killing: Amruthas father hired killers for Rs 1 crore 7 arrested

हैदराबादः आपल्या मुलीने दलित मुलासोबत आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या मुलीच्या पित्याने गुंडांना तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी देऊन जावयाची हत्या केल्याची घटना येथे घडली असून, खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'तेलंगणाच्या नालगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा येथे दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आली. मिरयालगुडा येथील मारोतीराव या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची मुलगी अमृता वार्षीनी व तिचा शाळेतील मित्र प्रणय कुमार (वय 23) यांनी आठ महिन्यापूर्वी घरच्यांचा विरोध पत्कारुन आंतरजातीय विवाह केला होता. अमृताच्या वडिलांकडून या जोडप्याला अनेकदा धमकावण्यातही आले होते. अमृता वार्षीणी, तिचा पती प्रणय कुमार व सासू हे रुग्णालयामधून बाहेर पडत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या गुंडांच्या टोळीने प्रणयवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रणयचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अमृत वार्षीणी ही गर्भवती आहे. अमृताने तिचे वडील मारोती राव आणि काका टी. श्रवण या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जावई प्रणयची हत्या करण्यासाठी मारोती राव यांनी गुंडाशी बोलणी केली होती. हत्येसाठी गुंडांनी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर एक कोटींची सुपारी ठरली. या गुंडांना 50 लाख रुपयांची रक्कम हत्येपूर्वीच देण्यात आली होती,' अशी माहिती पोलिस अधिकारी ए. व्ही. रंगनाथ यांनी दिली.

प्रणयच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अब्दुल बारी याच्यासह सात जणांना अटक केली आहे. बारी हा गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणात आरोपी होता. त्याला सीबीआयने अटक केली होती. पुढे न्यायालयाने त्याची मुक्तता केली होती.

अमृता व प्रणय हे शाळेतील एकमेकांचे मित्र होते. दोघांमधील मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी विवाह केला होता. परंतु, अमृताच्या वडीलांना हे मान्य नव्हते. विवाह केल्यानंतर त्यांनी धमकावणे सुरूच ठेवले होते. गर्भवती असलेल्या अमृतासोबत प्रणय व त्याची आई रुग्णालयात गेले होते. रुग्णालयातून बाहेर पडताना अमृतासमोरच प्रणयवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये प्रणयचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, 'सैराट' या चित्रपटात आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. 'सैराट' चित्रपटालाही लाजवेल अशी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. आपल्या मुलीने दलित मुलासोबत आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या एका पित्याने एक कोटींची सुपारी देऊन जावयाची हत्या केली आहे. तेलंगणामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com