भाजप महिला आमदाराचा मंदिरात प्रवेश; मंदिराला धुतले गंगेच्या पाण्याने

वृत्तसंस्था
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

अजूनही आपल्या देशात महिला पुरुष हा भेदभाव मोठ्या प्रमाणावर केला जातो. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये अशीच एक लाजीरवाणी घटना घडली आहे. एका महिला आमदाराने मंदीरात जाऊन दर्शन केले, म्हणून येथील मंदिर गंगाजलाने धुण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. भाजपाच्या आमदार मनिषा अनुरागी यांनी धूम ऋषी आश्रम मंदिरात पूजा केली. मात्र अनुरागी मंदिरातून बाहेर पडताच मंदिर गंगाजलानं धुण्यात आले. 

हरमीरपूर - अजूनही आपल्या देशात महिला पुरुष हा भेदभाव मोठ्या प्रमाणावर केला जातो. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये अशीच एक लाजीरवाणी घटना घडली आहे. एका महिला आमदाराने मंदीरात जाऊन दर्शन केले, म्हणून येथील मंदिर गंगेच्या पाण्याने धुण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. भाजपाच्या आमदार मनिषा अनुरागी यांनी धूम ऋषी आश्रम मंदिरात पूजा केली. मात्र अनुरागी मंदिरातून बाहेर पडताच मंदिर गंगेच्या पाण्याने धुण्यात आले. 

मनिषा अनुरागी केवळ महिला आहेत, म्हणून मंदिर गंगाजलनं धुण्यात आल्याचा धक्कादायक घडला आहे. आमदार मनिषा अनुरागी यांनी मंदिर दर्शन केल्याची माहिती येथील स्थानिकांना समजताच, मंदिर अपवित्र झाल्याची ओरड करत त्यांनी मंदिर आणि मंदिरातील मूर्ती गंगाजलानं धुतली. स्थानिकांनी वर्गणी गोळा करत धूम्र ऋषीची मूर्ती अलाहाबादमध्ये आणली आणि तेथे मूर्तीला गंगाजलानं आंघोळ घातली. यानंतर मंदिरात मूर्तीची स्थापना केली. मंदिरातील एका पुजारीनं सांगितले की, आतापर्यंत या मंदिरात कोणत्याही महिलेनं प्रवेश केला नव्हता. ज्यावेळेस मनिषा यांनी मंदिरप्रवेश केला त्यावेळेस मी तेथे हजर नव्हतो. मी मंदिरात असतो तर त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नसता. येथे महिलांना मंदिर प्रवेश करण्यास परवानगी नाही.

दरम्यान, मनिषा अनुरागी उत्तर प्रदेशातील राठ मतदारसंघातील आमदार आहेत. मंदिर प्रवेश करुन काहीही अयोग्य असे वर्तन केलेले नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा यांनी दिली आहे. 'मंदिरात महिलांना प्रवेश नाही, याबाबतची माहिती नव्हती. तसेच मंदिरात प्रवेश करुन मी काहीही चूक केलेले नाही', असे मनिषा यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: UP Temple Purified With Ganga Water After Woman BJP Lawmaker Visit