श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

श्रीनगर - श्रीनगरच्या बाहेर सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात सुरू झालेली चकमक आज तब्बल चौदा तासांनी सायंकाळी सहाच्या सुमारास संपली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले असून, अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी शनिवारी रात्रीपासून येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये तळ ठोकला होता. ही शाळा श्रीनगर-जम्मू महामार्गाला लागून आहे. या चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.

ज्या ठिकाणी ही चकमक झाली ते स्थळ श्रीनगरमधील लष्करी मुख्यालयापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. हा भाग हायसिक्‍युरिटी झोन म्हणून ओळखला जातो. या शाळेमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी संपूर्ण इमारतीस घेराओ घातला होता. शनिवारी पहाटे 3.40 च्या सुमारास सुरू झालेली चकमक सायंकाळपर्यंत सुरू होती. तब्बल चौदा तास चाललेल्या या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले.

शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू : पाकिस्तानी लष्कराने आज शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू- काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय चौक्‍यांवर तोफगोळ्यांचा मारा केला. सकाळी साडेसहाच्या सुमारास नौशेरा सेक्‍टरमध्ये ही घटना घडल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली. पाकच्या या गोळीबारास भारतीय जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. मागील चोवीस तासांमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही दुसरी वेळ आहे.