Karnataka: ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारा मजकूर पाठ्यपुस्तकातून काढणार

कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणाच्या काही भागांवर आक्षेप घेतला होता.
School
Schoolसकाळ डिजिटल टीम

शालेय पाठ्यपुस्तकातील ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारा मजकूर काढून टाकण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय. इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील ‘नव्या धर्माचा उदय’ (Rise of New Religions) या अध्यायाचा परिचयात्मक भाग काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली होती.

कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या शालेय पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीने ब्राह्मणांची भावना दुखावणारा मजकूर काढून टाकावा आणि त्याठिकाणी सनातन धर्माची माहिती जोडावी, असे म्हटले आहे. (the Karnataka government said content hurting Brahmin sentiment should be removed in 8th class textbook)

School
मद्य पिणारे महापापी : नितीश कुमार

इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील सहाव्या अध्यायातील प्रास्तविक भागामध्ये असे म्हटले आहे की, “वैदिक काळात, हवनाच्या वेळी तूप आणि दुधाचा वापर करत असल्याने अन्नाची टंचाई निर्माण झाली होती. जी संस्कृत धार्मिक विधींमध्ये मंत्रोच्चारात वापरली जात होती, ती त्यावेळच्या सामान्य लोकांना समजत नव्हती, बौद्ध आणि जैन धर्म, पाठ्यपुस्तकातील धडा, सोप्या मार्गाने शिकवले गेले, ज्यामुळे या धर्मांची वाढ झाली.” या मजकूरमुळे ब्राम्हणांच्या भावना दुखावू शकतात त्यामुळे हा मजकूर काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

School
भाजप करणार ‘आप’चा भंडापोड

फेब्रुवारी २०२१ मध्ये, कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाच्या सदस्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची भेट घेतली होती आणि सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणाच्या काही भागांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर येडियुरप्पा सरकारने १७ फेब्रुवारी २०२१ रोजी एक परिपत्रक जारी करून हा धडा शिकवला जाऊ नये किंवा मूल्यमापनासाठी वापरला जाऊ नये असे निर्देश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com