...अशा राजकारणाला अर्थ नाही - नवज्योत कौर

वृत्तसंस्था
रविवार, 9 ऑक्टोबर 2016

अमृतसर - चुकीच्या घटनांविरूद्ध कोणी आवाज उठवू देत नसेल तर अशा राजकारणात काहीही अर्थ नसल्याचे म्हणत आमदार नवज्योत कौर सिद्ध यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे.

अमृतसर - चुकीच्या घटनांविरूद्ध कोणी आवाज उठवू देत नसेल तर अशा राजकारणात काहीही अर्थ नसल्याचे म्हणत आमदार नवज्योत कौर सिद्ध यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे.

नवज्योत कौर या पंजाबमधील अमृतसर (पूर्व) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षातील कार्यपद्धतीविषयी भाष्य करताना पक्षातील बहुतेक कार्यकर्ते इतर सहयोगी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. ‘मी माफियांना पाठिंबा देण्यासाठी पक्षात प्रवेश केलेला नव्हता. जर चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठविण्यापासून रोखण्यात येत असेल तर अशा राजकारणाचा उपयोग काय?‘ असा प्रश्‍नही नवज्योत कौर यांनी उपस्थित केला. तसेच ते पंजाबबाबत गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. "आमचा आतला आवाज आम्हाला सांगतोय की अकाली दलासोबत जा‘, असेही त्या पुढे म्हणाल्या. ‘भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंजाबमध्ये अकाली दलासोबत युतीमध्ये राहायचे नाही. पण आमच्या सूचनाही गृहित धरल्या जात नाहीत‘, असेही त्या पुढे म्हणाल्या.